कृपया नोंद घ्यावी. मराठी ब्लॉग जगत्‌चे ओळखचिन्ह ब्लॉगवर लावल्याशिवाय येथे मराठी ब्लॉग जगत्‌वर ब्लॉग जोडला जाणार नाही.

मराठी देवनागरीत कसे लिहाल?

मराठीतून ब्लॉग लिहायचा म्हणजे देवनागरी फॉन्ट हव्यातच पण दुर्दैवाने आपल्याकडे उपलब्ध असलेली श्रीलीपी, शिवाजी, आकृती या फॉन्ट्स इंटरनेटवर काही त्रुटी दर्शवतात. यामुळे मराठी लेखनासाठी युनिकोड फॉन्ट्चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे बराहा. हे एक छोटंसं सॉफ्टवेअर आहे, जे तुम्ही एकदा डाऊनलोड केलंत की तुमच्याकडे इंटरनेट असो वा नसो, तुम्ही सहजपणे मराठीतून टायपिंग करू शकता. बराहाची नवीन आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

बराहा व्यतिरिक्त ऑफलाईन म्हणजे इंटरनेट नसतानाही मराठीतून टायपिंग करण्यासाठी आणखी एक सुंदर पर्याय उपलब्ध आहे. याचं नाव आहे गमभन. हे सॉफ्टवेअर सुद्धा विनाशुल्क डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

जर बराहा किंवा गमभन सारखी सॉफ्टवेअर्स डाऊनलोड न करता ऑनलाईन मराठी टायपिंग करायचं असेल तर क्विलपॅड हा एक उत्तम पर्याय आहे. क्विलपॅड साईटवरील मराठी टायपिंगचा पर्याय पहाण्यासाठी इथे क्लिक करा.

खाली देखील मराठी टंकलेखनासाठीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.


* * * * *

आद्याक्षरावरून ब्लॉग शोधा

लृ अं अ: क्ष ज्ञ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 Other