कृपया नोंद घ्यावी. मराठी ब्लॉग जगत्‌चे ओळखचिन्ह ब्लॉगवर लावल्याशिवाय येथे मराठी ब्लॉग जगत्‌वर ब्लॉग जोडला जाणार नाही.

अटी व नियम

तुमचा ब्लॉग मराठी ब्लॉग जगत वर जोडला जाण्यासाठी खालील सर्व अटी व नियमांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

१. मराठी अनिवार्य: मराठी ब्लॉग जगत वर जोडल्या जाणार्‍या ब्लॉगवर मराठी नोंदी असणे आवश्यक आहे. मराठी व इतर भाषा असे मिश्र ब्लॉग्स अवश्य स्विकारले जातील.

२. ओळखचिन्ह अनिवार्य: मराठी ब्लॉग जगत वर जोडल्या जाणार्‍या ब्लॉगवर मराठी ब्लॉग जगत्‌चे ओळखचिन्ह लावलेले असणे अनिवार्य आहे. ब्लॉगरने ओळखचिन्ह जोडले नसल्यास सदर ब्लॉगच्या नोंदी मराठी ब्लॉग जगत्‌ वर दिसणार नाहीत. ओळखचिन्हाचा कोड मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

३. संक्षिप्त नोंदी: मराठी ब्लॉग जगत वर ब्लॉग नोंदी संक्षिप्त स्वरूपातच प्रकाशित होतील. प्रतिमा, व्हिडीओ स्वरूपातील नोंदी म.ब्लॉ.ज. वर दिसणार नाहीत.

४. साहित्यचौर्य निषिद्ध: मूळ ब्लॉगरला श्रेय न देता, त्याच्या नोंदी जशाच्या तशा स्वत:च्या ब्लॉगवर प्रसिद्ध करणार्‍या ब्लॉगर्सचे ब्लॉग मराठी ब्लॉग जगत वर जोडले जाणार नाहीत. आधीच जोडलेल्या एखाद्या ब्लॉगवर भविष्यात असा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर ब्लॉग कोणतीही पूर्वसूचना न देता मराठी ब्लॉग जगत्‌च्या नोंदींमधून काढून टाकण्यात येईल.

५. अश्‍लील साहित्य प्रकाशित करणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही. आधीच जोडलेल्या एखाद्या ब्लॉगवर भविष्यात अश्‍लील साहित्य प्रकाशित होऊ लागल्याचे निदर्शनास आल्यास, सदर ब्लॉग कोणतीही पूर्वसूचना न देता मराठी ब्लॉग जगत्‌च्या नोंदींमधून काढून टाकण्यात येईल.

६. इतरांच्या धार्मिक, जातीय किंवा राजकीय भावना प्रक्षुब्ध होतील असे लेखन प्रसिद्ध करणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही. आधीच जोडलेल्या एखाद्या ब्लॉगवर भविष्यात असा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर ब्लॉग कोणतीही पूर्वसूचना न देता मराठी ब्लॉग जगत्‌च्या नोंदींमधून काढून टाकण्यात येईल.

७. सर्वसाधारणपणे कुठलाही मराठी ब्लॉग येथे २४ ते ४८ तासांच्या आत जोडला जाईल, मात्र काही तांत्रिक अडचण आल्यास ब्लॉग जोडण्यास तीन ते चार दिवसांचाही अवधी जाऊ शकतो.

८. वरील सर्व अटी व नियम मान्य असल्यास कृपया या लिंकवर जाऊन दिलेल्या फॉर्ममधे आपली माहीती भरून पाठवा.

९. एकदा जोडलेला ब्लॉग नवीन नावाने इथे जोडावयाचा असेल, तर ह्या लिंकवर उपलब्ध असलेला फॉर्म भरावा.

१०. अपूर्ण अथावा चुकीची माहिती भरलेला फॉर्म रद्द करण्यात येईल.

आद्याक्षरावरून ब्लॉग शोधा

लृ अं अ: क्ष ज्ञ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 Other