कृपया नोंद घ्यावी. मराठी ब्लॉग जगत्‌चे ओळखचिन्ह ब्लॉगवर लावल्याशिवाय येथे मराठी ब्लॉग जगत्‌वर ब्लॉग जोडला जाणार नाही.

म.ब्लॉ.ज. काय आहे?

मराठी ब्लॉग जगत्‌ ही खास मराठी ब्लॉगर्सकरता तयार केलेली डिरेक्टरी आहे. मराठी ब्लॉग विश्वात आज प्रत्येक दिवशी नवनवीन ब्लॉग्सची भर पडते आहे. मात्र हे सर्व ब्लॉग्स वाचले जातातच असे नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे असा ब्लॉग अस्तित्वात आहे, हे माहित नसणं. प्रत्येक ब्लॉग हा कुठल्या ना कुठल्या ब्लॉग डिरेक्टरीत जोपर्यंत जोडला जात नाही, तोपर्यंत त्याची माहिती वाचकांना मिळत नाही. खास मराठी ब्लॉग्ससाठी असलेल्या डिरेक्टरीजचे प्रमाणही अत्यल्प आहे. यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

या डिरेक्टरीमधे एकदा तुमचा ब्लॉग जोडला की त्यानंतर तुमच्या ब्लॉगवर प्रकाशित होणारी प्रत्येक नोंद मराठी ब्लॉग जगत्‌च्या मुख्यपृष्ठावर दिसू लागेल. तसेच जोडलेले ब्लॉग या सदराअंतर्गत आद्याक्षरावरून ब्लॉग शोधण्याची सोयही इथे उपलब्ध करून दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर जोडलेल्या प्रत्येक ब्लॉगची संक्षिप्त माहिती देणारे स्वतंत्र पानही प्रत्येक ब्लॉगसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.

मराठी ब्लॉग जगत्‌ वर २४ तासांच्या आता ब्लॉग जोडला जाण्याची सुविधा आहे. जर एखाद्या तांत्रिक कारणामुळे उशीर झाला तरच ब्लॉगरला ३ ते ४ दिवस वाट पहावी लागेल. या शिवाय ब्लॉगर्सना मराठी ब्लॉग जगत्‌च्या व्यवस्थापकांशी संपर्क साधता यावा म्हणून संपर्कासाठी वेगळा फॉर्म तयार करण्यात आला आहे.

म.ब्लॉ.ज. वर ब्लॉग जोडण्यासाठी काही अटी व नियम आहेत. त्यांची पूर्तता होणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाढत्या साहित्यचोरीला तसेच हीन दर्जाच्या साहित्यप्रसाराला आळा बसावा या हेतूने काही अटी तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून मराठी ब्लॉग जगतामधे स्वलिखित व दर्जेदार लेखनाचा पुरस्कार होऊ शकेल.

जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर्सनी या डिरेक्टरीमधे आपल्या ब्लॉगची नाव नोंदणी करावी आणि आपल्या ब्लॉगची माहिती सर्वांना द्यावी. या डिरेक्टरीत आपला ब्लॉग जोडला गेला आहे, हे ओळखण्यची खूण म्हणजे मराठी ब्लॉग जगत्‌चे ओळखचिन्ह. हे ओळखचिन्हदेखील आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा.

आद्याक्षरावरून ब्लॉग शोधा

लृ अं अ: क्ष ज्ञ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 Other